Wednesday, November 25, 2020

झिम्मा!

 झिम्मा !!!

हातात दोर माझ्या देऊन तू फरारी 

रक्तास का पिपासू इथली उपासमारी? 

दु:खास पारखा रे अजूनी मुका मदारी 

चालू कशी अजूनी अधम्या तुझी मुजोरी?

देऊन टाक आता माझ्या जुन्या कट्यारी

मागे अजून आमच्या का वाजते तुतारी?

दुःखास वाढले मी ताटामध्ये नव्याने 

माझ्या खुनास टपले ते होऊनी फितुरी

वाटाघटी कराया तो काय साव झाला? 

रक्तास सांडताहे माझ्या कसे शिकारी!

संघर्ष आत होता मी झोपलो उपाशी,

 देऊन प्राण माझे मी जाहलो भिकारी!

पिऊन टाकले रे आधीच विष ज्याने, 

तो निलकंठ वाटे मजला मधुर भारी

दे यातना सुखांशी खेळून आज झिम्मा, 

ही वेळ येत नाही पुन्हा फिरून दारी

दारासमोर माझ्या ह्या सावल्या उन्हाळी 

घेऊन आत येती हातामध्ये पहारी 

मन चिंब चिंब भिजुनी येता दुपारवेळी

 तुम्हास या 'झळाया' का लागता जिव्हारी?

भोगास पात्र व्हाव्या माझ्या व्यथा नव्याने

 मी रोज 'डाव' देतो आत्म्यास शोककारी! 

कोणासही पडो ना माझी उगाच भ्रांती 

मी खूप दूर जातो घेऊन 'एकतारी'!

शिवनाथ अशोक तक्ते 9595687764/­eshivprabhat@gmail.co­m

Saturday, June 13, 2020

महंकाळेश्वरा!

प्रथांच्या वाळवंटात कुठेही जा
असमान धग दिसते अवती भोवती
शरीर विधींना समर्पित केल्याने
आत्म्याला सोन्याची झळाळी 
प्राप्त होईल, *महांकाळेश्वरा?
पैशाने मालमत्ता मिळवता
येईल
मालमत्तेमुळे लोकात बोलबाला
होईल,
पण श्रमाने माझ्यातील
तू संतुष्ट होशील,
महांकाळेश्वरा!
आंधळ्यास काठीचा आधार,
प्रवाश्यास सावलीचा आधार,
शेवटचे द्वार तुझ्याकडेच
खुलले जाणार,
तरीही लोक जातात
 तुझ्याऐवजी
लौकिक सुखलुप्त प्रदेशात,
महांकाळेश्वरा!

दोषांची पुनरावृत्ती टाळता येईल,
पण सदोष वर्तनाला माफी नको,
प्रत्येक बाजूचे गणित मांडता येईल
पण हिशोबात धरता येणाऱ्याआपुलकीच्या 
नात्यांची गोळाबेरीज बरोबर येईल,
महांकाळेश्वरा?

शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
* महांकाळेश्वर: आश्वी खुर्द  ता. संगमनेर जि. अ. नगर येथील महादेव (शिवलिंगाचे नाव)

Sunday, May 24, 2020

पंच/ शिष्टाचार प्रथा

पंच/ शिष्टाचार प्रथा 
मी दि. १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी अंदरसूल ता. येवला येथे माझ्या आतेबहिणीच्या लग्नसमारंभासाठी (खासकरून देवक- देवकार्य साठी) आलो होतो. तेथे 'पंचाला येणे', पंच बोलावणे आदी रीत-परंपरा असल्याचे कळले. लिंगायत समाजात असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. कारण अशी पद्धत मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिकरोड ह्या ठिकाणचे अपवाद वगळता इतरत्र कोठेही असल्याचे ऐकिवात नाही. आणि म्हणूनच ह्या  वैभवशाली परंपरेबद्दल लिहावं असं मला वाटलं. 
आपल्या रूढी, प्रथा आणि त्यांचे पूर्वापार चालत आलेले आपण सर्व पाईक. हा आपला वैभवशाली भूतकाळ आपल्याला सतत  आपले भविष्य आणि भवितव्य ठरविण्यासाठी प्रेरणा देतो. प्रेरणा, जाणिवा, नेणिवा यांची मूळं आपल्या प्रदीर्घ आणि पूर्वापार चालत आलेल्या, आणि आपण निष्ठेनं चालविलेल्या प्रथा-परंपरांमध्ये आहे. पंचाला येणे ही अशीच एक पद्धत आहे. हिलाच 'शिष्टाचार' असेही म्हणतात. लग्न, मुंज, अंत्यविधी इत्यादी साठी पुरोहित्य करणारे जंगम स्वामी सदर पंचाला येण्याचं निमंत्रण देतात. रात्री निवांत (०९:००-०९:३०) च्या दरम्यान लग्नघरी जमतात. ह्या शिष्टाचारचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडलेला असतो. तसेच ज्या घरी पंच बोलावले जातात त्यांनी पंचांना 'बाब' (एक ठराविक रक्कम!) देण्याची पद्धत आहे. समाजातील लोकांना लग्नपत्रिका देण्याची पद्धत नसल्याचे मला माहित होते. तसेच लिंगायत समाजातील बहुतांश लोक हे व्यापारी असल्याने त्यांना एकत्र आणण्याची ही एक आदर्श पद्धत आहे. समजाला ही मिळणारी रक्कम(बाब) समाज हितासाठी तसेच जंगम स्वामींना दक्षिणा देण्यासाठी केला जातो. पंच आल्यानंतर त्यांना पाणी, पानसुपारी, जाहीर आवतन देणे आणि शेवटी चहा देणे हा ह्या परंपरेचा भाग आहे. पंच बोलावणे (असणे) किंवा शिष्टाचार ही एकविसाव्या शतकातील 'सहविचार सभा' च असून त्या सभेचे मूळ १२व्या शतकातील 'शिवानुभवमंटप' ह्या आदर्श आणि आद्य लोकविचार सभेतच आहे असे म्हणावे लागेल!

Wednesday, May 6, 2020

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव! (कविता)

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव!

आपल्या खोट्या शपथांच्या पुण्याईवर 
जगू पाहणारे आपण एकजात भ्रष्ट प्राणीच,
नाहीतर काय! शुलिभंजन, देवगिरी, भद्रामारुती,
एवढंच काय बिकावू पदव्यांच्या आणि खैरातींच्या
बळावर बळकाविलेल्या जागा किंवा तत्सम प्रलोभनं
 सुद्धा थांबवू शकलं नाही आपल्याला क्षणभर.

झेंगाटखोर वातावरणात तापदायक वाटू लागलेल्या
कुटाळक्या, चहापान आणि मेजवान्याही 
करू नाही शकल्या आपल्याला डळमळीत किंचितही.
पीएचड्यांचे पेव आणि प्रबंधांचे भाव ऐकून
थोडा सुद्धा ढळला नाही तोल
याचं अजूनही नवल वाटत नाही,
एकूण एक हाही स्वप्नरंजित अविर्भावच!

नात्यांची, खानावळींची, मारुतीला घातलेल्या खेटांची,
आणि त्यातच भविष्यबद्दलची असलेली अनास्था
लपवू शकलो नाहीच आपण!
किमान स्वतः पुरता क्रूरपणा
राखीव ठेवता येतोच ना!
त्यात आणखी मोकळं आणि हलकं 
वाटण्यासारखं काय आहे?
खोटेपणाचा रेटा हा आपल्या
जीवनशैलीत आपण मिरवलेला
आणि जिरवलेला मूर्तिमंत क्रूरपणा.

बाकी अस्तित्वासाठीची अवीट धडपड,
महानगरांकडे वळवलेलं चित्त,
विद्यापीठीय घुमजाव, पंडित चौरासीयांचं 
बसरी वादन, आनंदसागर किंवा
सपाट फळ्याकडे पाठमान करून
नसती ओढाताण आणि उष्टावळ्या 
न काढण्याची द्विरुक्ती!

या सगळ्यात 'गझलांवर' निस्सीम
 प्रेम करणारे प्राध्यापक, 
त्यांच्या तंत्रज्ञानशून्यतेवर यथेच्छ
शेरे मारणारे आपण, 
आणि नित्यनेमाने मारुतीला माथा
टेकवणारे बुजुर्ग चाचा!
आणि याच्याही कितीतरी वर
थेट चैतन्याच्या परिसीमा भेदून 
गवसणी घालणारं निवृत्तीतलं
निस्सीम ज्ञान, मूर्तिमंत कोश
आणि ऋषितुल्य विद्यापीठ!

हे सगळं खोलवर, अत्यंत अटळ
आणि दाट विस्मृतीच्या वाटेवरील 
वास्तव, की विस्तव,
कि नेहमी प्रमाणेच--
बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव?

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,
सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)
जनसेवा  फौंडेशन लोणी बु संचलित 
कला व वाणिज्य महाविद्यालय, शेंडी (भंडारदरा) 
ता. अकोले, जि. अहमदनगर

Monday, March 30, 2020

पाय! (कविता)

पाय!

जळतो आहे माथ्यावर सूर्य 
कोपीष्ट मुद्रेनं
आणि तापलाय रस्ता, 
ओघळू लागलंय डांबर 
भयतालावर ...

स्थिर-स्थावर रस्ते आणि चौक मध्यावर 
अशांत प्रहरी जनजीवन विस्कळीत पण 
वाहतो आहे रस्ता आतून अदृश्य.

तरीही नजरेत न भरणारं, 
अंतःकरण पिळवटू न शकणारं दृश्य
चालू लागलेत पूर्णपणे विकसित
न झालेले इवले-इवले पाय
संबंध आयुष्याचा कोळसा झालेल्या
भेगाळ पावलांच्या पाठोपाठ...

पाठमोऱ्या आकृत्यांचा एकसारखा 
पाठलाग करणाऱ्या भयकंपग्रस्त सावल्या
जठराग्नी चेकाळून उठलाय आता
पण दशम्या तर केव्हाच झाल्या!

मग पाण्याचा एक एक घोट 
शोधणाऱ्या बोथट नजरा
दार बंद, आतून कड्या आणि 
मालिकांच्या शिर्षकगीतांचा धुमाकूळ!

पुन्हा नजर अनाठायी रस्त्यावर
एकेक पाऊल टाकत आपलं गाव 
जवळ करणाऱ्या ओसाड माणुसकीच्या
प्रदेशांतून पायपीट करणाऱ्या महामार्गी
पाणावलेल्या नजरा आणि कोरड्या घशाला 
समजावत आवंढा गिळणाऱ्या मार्गस्थ 
हातावर पोट आणि पृथ्वी टिकवणाऱ्या
हाडा-मांसाच्या पिढ्या...! 

शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
२९/०३/२०२०

Wednesday, February 26, 2020

वर्मी घाव बसल्या सारखं

पूर्णांक-अपूर्णांक
शपथेवर सांगण्यातल्या काही गोष्टींपैकी एक महत्वाची बाब म्हणजे #आताच्या पिढीला नेमकं झालंय काय?
आज काल सर्रासपणे (रिकामटा!) चालणारा उद्योग म्हणजे
¶ जमिनीवर पालथं पडून घेतलेला फोटो स्क्रीनवर, स्टेटसवर अथवा वॉलवर ठेवणं.
¶ स्वतःला वेगवेगळ्या रुपात आणि स्वरूपात पाहणं किंवा तसे फोटो संपादित (edit) करणं.
¶ तर्हेवाईक हेअर कट आणि हेअर स्टाईल करणं जे (मुळातच हेटाळणीजन्य असतं!) मुळीच सुट होणारं नसतं.
¶ कपड्यांचा सेन्स आणि पेहराव तर अत्यंत बटबटीत. (फाटलेल्या विजारी म्हणजे आर्थिक परिस्थितीची खुली जाहिरातच!)
¶ स्वतः चं अति दैवतीकरण आयकॉनिकरण.
¶ हातामध्ये शस्त्र (पिस्तुल, तलवार इत्यादी) घेऊन काढलेले फोटो.
¶ विनाकारण 'त्या' गटात न बसणाऱ्या लोकांस बेदरकार आणि बेसुमारपणे टॅग करून त्रास देणे.
     आदि उपद्व्याप करून नेमकं काय मिळवायचंय आणि काय दाखवायचंय ह्या #आजच्या पिढीला? हेच कळण्याच्या पलीकडचं झालंय.

● शस्त्रांबरोबर फोटो काढण्यापेक्षा 'शास्त्रा'बरोबर(  विशेषतः पुस्तकांबरोबर) फोटो काढल्यास कोणता कमीपणा येईल?
● फॅन्सी ड्रेस पेक्षा बदल म्हणून महापुरुषांच्या व्यक्तिरेखा   जगण्याचा प्रयत्न करता येईल का?
● झाडांबरोबर सेल्फी काढून तो स्टेटसवर ठेवता येणार नाही का?
  विचार प्रक्रिया आणि मानसिकतेत परिवर्तन होण्याची हीच खरी वेळ आहे.
शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर

Wednesday, February 5, 2020

हिंदू: जाणिवांचे स्वप्निव आणि वास्तवी उत्खनन

हिंदू: जाणिवांचे स्वप्नीव आणि वास्तवी उत्खनन
शिवनाथ अशोक तक्ते
सह. प्राध्यापक,
इंग्रजी विभाग,

 प्रा. नेमाडे यांनी ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ मध्ये मांडलेला निरंतर व्याप लक्षात घेता मला त्यातील भू-सांस्कृतिक जाणिवांचा तळ गाठण्याचा मोह झाला. ह्या कादंबरीला असलेले अनेक आयाम हे विविध जाणीव कल्पून घेऊन प्रकट होतात. एकाच वेळी ती वेगवेगळ्या स्तरांवर वाहत असते. तरीही आपला आत्मा, आपलं केंद्र अजिबात हरवू देत नाही. कादंबरीचा नायक खंडू अलियास खंडेराव विठ्ठल हा एक पुरातत्वीय संशोधक असून हडप्पा मोहेंजो-दडो प्रकल्पामध्ये कार्यरत असतो. त्याच्या बोलण्यात, वागण्यात आणि अभिव्यक्तीत असलेला ‘अंगार’ विविध चर्चा, चर्चासत्रे, परिसंवादांमधून उफाळून येतो. याचे मूळ तो स्वता: आपल्या मनाच्या चोरखणात कोंडलेल्या ‘संतापात’ असल्याचे (पान. ६८) कबूल करतो. नेमाडे खन्डेरावच्या तोंडून भविष्यवाहू आशा वदवून घेतात. 
              “साधेपणा किती उदात्त असू शकतो, हे              आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो.
              ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. हिंदू लोक
              काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात
              गच्च जपून ठेवली आहे. सगळं तिथे अंधारात कुठेतरी ठेवलेलं असतं. ते न दिसू दे. हरवू दे. स्मृतीतून सुद्धा जाऊ दे. काही बिघडत नाही. केव्हातरी सापडेलच.”
(हिंदू  पान. २७.)
खंडेराव ह्या सर्व आधुनिकतेच्या कचाट्यात हरवलेल्या जाणिवांचा आणि नेणिवांचा शोध घेण्याचा आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करतो. त्याचं ह्या शोधार्थ अविरत अंत:बाह्य उत्खनन चालू असते. विचारांदरम्यान त्याचा निरंतर प्रवास दिसून येतो. आदिम संस्कृतींचा शोध घेताना खंडेराव आत्ममग्न होतो. त्याचे हे उत्खनन अनेक पातळ्यांवर चालू राहते. मोहेंजो-दडोत काम करत असताना त्याला डॉ. जलील, प्रा. संखाळीया यांचा विशेष आदर वाटतो. वयाच्या ८० व्या वर्षीही जलील सरांचा उत्खनना बाबतचा जोश खंडेरावला आवडतो.
 'मोरगाव' पासून सुरु होणारा खंडूचा प्रवास त्याला कितीदा पुन्हा पुन्हा मोरगावलाच  घेऊन येतो. यावरून त्याची आपल्या गावाशी असलेली घट्ट नाळ दिसून येते. खंडेराव आपल्या मित्राचा-अलीचा उल्लेख 'यारु' असा करतो. यारुला तो आपली सर्व गुपिते सांगू शकतो. अगदी आपल्या 'तीरोनी आत्या' बद्दलही. तिला शोधण्यासाठी खंडेराव अलीच्या मदतीने लाहोर, पेशावर, रावळपिंडी इ. ठिकाणी असलेले महानुभाव मठ पालथे घालायला तयार आहे.  नेमाडे यांनी आपल्या नायकाला असलेले भाषिक भान वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. महानुभवी मराठी रूप (यार- यारु) ही त्या जाणिवेची आठवण करून देते.
तसे पाहता 'हिंदू' च्या रूपाने नेमाडे सरांनी एक बृहद् असा सांस्कृतिक परिप्रेक्ष्य उभा केला आहे. पण ते स्वतः एका मुलाखतीमध्ये उल्लेख करतात की हा (हिंदूचा) पहिला खंड म्हणजे वादाच्या झाडाची फक्त एक फांदी आहे. यावरून नेमाडेंच्या साहित्यिक ताकदीची कल्पना येते. उत्खनन कॅम्प जवळील हॉटेलवाला दिलवर आणि आपले वडील विठ्ठलराव यांना उर्मट भाषेत हकालणारा हॉटेल मालक या दोघांत खंडेरावला कमालीची तफावत दिसून येते. जाणिवांच्या इतिहासातील 'मडकं' हा एक ठळक टप्पा आहे. मडकं हा एक संपलेल्या आयुष्याचा आशय. आशयशून्य घाट म्हणजे आयुष्य. ( पान ७१) असे खंडेराव सांगतो. हिंदूचे आशयसूत्र हे खंडेराव च्या स्वप्नांच्या प्रदेशातून मुशाफिरी करताना आढळते. नेणिवेच्या तळाला साचलेल्या संवेदना जाणीवेच्या पातळीवर आणून सोडत खंडेराव भूतकाळ आणि भविष्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतो. विपरीत घटनांचा समाचार घेताना 'गंदी बात'  चा जाणून बुजून केलेला वापर विलक्षण आहे. धनाजीची गोष्ट सांगताना माणूस कसा आपल्याच मायाजालात ओढला जातो हे खंडेराव सांगतो. पीएचडी चा सातत्यानं येणारा संदर्भ त्याला भविष्य आणि वर्तमानाशी जोडतो. त्याच्यामते पीएचडी हा शक्यतेवर आधारित आशावाद आहे. वडील आजारी असल्याची तार आल्यावर त्याला काम अर्धवट सोडून मोरगावला परतावे लागते. या कामी त्याला अलीची खूप मदत होते. परतीच्या प्रवासात असताना तो वडिलांच्या आठवणीत रमतो. आणि आपला डोळा विटी लागल्यामुळे सुजला असताना  वडील त्याला जळगावला मोफत कॅम्प मध्ये घेऊन जातात. तेव्हा वडील खंडूची आई प्रमाणे काळजी घेतात. माघारी येताना खूप उशीर होतो. वडील त्याला पाठकुळी घेऊन येतात. अन आताही बाबा त्याला (लाहोर वरून मोरगावला येताना) घेऊन जात असल्याची जाणीव होते. आपला मोठा भाऊ 'भावडू' याच्या अकाली निधनामुळे खंडेराव व्यथित होतो. मोरगाव हे खंडूचं (अन हिंदूचं ही) केंद्र आहे. तो जेवढा मोरगाव पासून दूर जाईल तेवढी त्रिज्याच फक्त वाढेल पण केंद्र बदलणार नाही. आधिभौतिक (metaphysical)  सिद्धांताच्या आधारे खंडेराव आणि त्याचे गाव यातील नाते स्पष्ट होते. तसेच खंडेरावच्या नेणिवा  आणि जाणिवांचा  पसारा दिसून येतो.

संदर्भ:-
नेमाडे, भालचंद्र.२०१०.हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन.
IBN लोकमत वृत्त वाहिनी वर महेश म्हात्रे यांनी मराठी भाषा दिन निमित्त नेमाडे सरांची
   घेतलेली मुलाखत    

Language and Philosophy

“Listen, O lord of the meeting rivers, things standing shall fall,
but the moving ever shall stay.”- BASAVANNA

God gave us light to illumine darkness within each microcosm. Rudra is the God of power and music. He shall always be the source of universal energy. He has created the paths and the followers to walk upon them. Sound and silence are equally important in communication, because both create the equal effect on the mind of interactants as well as passive listeners. Whatever is standstill will one day never be as it is. It will become air for nothing. But what is mobile will be for no end. The physical properties, men and women as concrete instances of the genesis shall not remain for the centuries. But the mental abilities of them, their means of interaction will definitely live long, because language is mobile, in the sense, ever changing. The reasons behind each and every cause and pause will be forgotten, on the other hand, their means shall always be present. Truly, language is the real and immortal existence of human being. Similarly, it is the ‘species specific…’ property of human being. The world of ideas and knowledge has observed changes in language diachronic and synchronic manners. It means, change, mobility, and movement are at the heart of an ever-last entity. One way or the other, spirituality and linguistics are connected with each other at compass-end.
Human mind is a fertile womb. And need is the mother to research. At large, in order to get perfection, man is convinced to be in the search of answers which he/she want to find out. Any purposeful discovery or invention is, in the blithe spirit, can be seen as a brainchild. Research should always be a systematic way to uncover, reveal, reinvestigate, formulate, and limit a problem. Once a problem is evolved, it evolves a researcher too. Therefore, there is an ‘umbilical connection’ between the problem and the researcher. Resolution of a problem is at the genesis of another problem and hence the chain of problems is kept in music to bring novelty in life. It makes to think, and to prove the unending social existence. Man is alive in his deed. Research clarifies the faults in communication between or among people. It develops an organic bond between the groups of people. Aristotle says, “Man is by nature a zoon politikon”. So, research, in humanities, is essentially to find out communication in the real situations. The researcher is of the view that research is a man’s search for life. Literature is a great source of keeping interactions among people at different levels. And drama is the prototype of observing communication among people. Man is not aloof from his social, cultural, and dynamic existence. Denial of this is a revolt against humanity.  Man always claims value to self. He expects from others to maintain it. He also expects that others should aware of his social identity. Seriously, he does not allow anybody to intervene into his own social existence. Politeness or being polite is a key to achieve each kind of satisfaction. If one wants respect for the self, he must be ready to consider the value of the other self.

Monday, January 13, 2020

Introduction that I had attempted but removed from my MPhil Dissertation