हिंदू: जाणिवांचे स्वप्नीव आणि वास्तवी उत्खनन
शिवनाथ अशोक तक्ते
सह. प्राध्यापक,
इंग्रजी विभाग,
ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. हिंदू लोक
काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात
गच्च जपून ठेवली आहे. सगळं तिथे अंधारात कुठेतरी ठेवलेलं असतं. ते न दिसू दे. हरवू दे. स्मृतीतून सुद्धा जाऊ दे. काही बिघडत नाही. केव्हातरी सापडेलच.”
(हिंदू पान. २७.)
खंडेराव ह्या सर्व आधुनिकतेच्या कचाट्यात हरवलेल्या जाणिवांचा आणि नेणिवांचा शोध घेण्याचा आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करतो. त्याचं ह्या शोधार्थ अविरत अंत:बाह्य उत्खनन चालू असते. विचारांदरम्यान त्याचा निरंतर प्रवास दिसून येतो. आदिम संस्कृतींचा शोध घेताना खंडेराव आत्ममग्न होतो. त्याचे हे उत्खनन अनेक पातळ्यांवर चालू राहते. मोहेंजो-दडोत काम करत असताना त्याला डॉ. जलील, प्रा. संखाळीया यांचा विशेष आदर वाटतो. वयाच्या ८० व्या वर्षीही जलील सरांचा उत्खनना बाबतचा जोश खंडेरावला आवडतो.
'मोरगाव' पासून सुरु होणारा खंडूचा प्रवास त्याला कितीदा पुन्हा पुन्हा मोरगावलाच घेऊन येतो. यावरून त्याची आपल्या गावाशी असलेली घट्ट नाळ दिसून येते. खंडेराव आपल्या मित्राचा-अलीचा उल्लेख 'यारु' असा करतो. यारुला तो आपली सर्व गुपिते सांगू शकतो. अगदी आपल्या 'तीरोनी आत्या' बद्दलही. तिला शोधण्यासाठी खंडेराव अलीच्या मदतीने लाहोर, पेशावर, रावळपिंडी इ. ठिकाणी असलेले महानुभाव मठ पालथे घालायला तयार आहे. नेमाडे यांनी आपल्या नायकाला असलेले भाषिक भान वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. महानुभवी मराठी रूप (यार- यारु) ही त्या जाणिवेची आठवण करून देते.
तसे पाहता 'हिंदू' च्या रूपाने नेमाडे सरांनी एक बृहद् असा सांस्कृतिक परिप्रेक्ष्य उभा केला आहे. पण ते स्वतः एका मुलाखतीमध्ये उल्लेख करतात की हा (हिंदूचा) पहिला खंड म्हणजे वादाच्या झाडाची फक्त एक फांदी आहे. यावरून नेमाडेंच्या साहित्यिक ताकदीची कल्पना येते. उत्खनन कॅम्प जवळील हॉटेलवाला दिलवर आणि आपले वडील विठ्ठलराव यांना उर्मट भाषेत हकालणारा हॉटेल मालक या दोघांत खंडेरावला कमालीची तफावत दिसून येते. जाणिवांच्या इतिहासातील 'मडकं' हा एक ठळक टप्पा आहे. मडकं हा एक संपलेल्या आयुष्याचा आशय. आशयशून्य घाट म्हणजे आयुष्य. ( पान ७१) असे खंडेराव सांगतो. हिंदूचे आशयसूत्र हे खंडेराव च्या स्वप्नांच्या प्रदेशातून मुशाफिरी करताना आढळते. नेणिवेच्या तळाला साचलेल्या संवेदना जाणीवेच्या पातळीवर आणून सोडत खंडेराव भूतकाळ आणि भविष्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतो. विपरीत घटनांचा समाचार घेताना 'गंदी बात' चा जाणून बुजून केलेला वापर विलक्षण आहे. धनाजीची गोष्ट सांगताना माणूस कसा आपल्याच मायाजालात ओढला जातो हे खंडेराव सांगतो. पीएचडी चा सातत्यानं येणारा संदर्भ त्याला भविष्य आणि वर्तमानाशी जोडतो. त्याच्यामते पीएचडी हा शक्यतेवर आधारित आशावाद आहे. वडील आजारी असल्याची तार आल्यावर त्याला काम अर्धवट सोडून मोरगावला परतावे लागते. या कामी त्याला अलीची खूप मदत होते. परतीच्या प्रवासात असताना तो वडिलांच्या आठवणीत रमतो. आणि आपला डोळा विटी लागल्यामुळे सुजला असताना वडील त्याला जळगावला मोफत कॅम्प मध्ये घेऊन जातात. तेव्हा वडील खंडूची आई प्रमाणे काळजी घेतात. माघारी येताना खूप उशीर होतो. वडील त्याला पाठकुळी घेऊन येतात. अन आताही बाबा त्याला (लाहोर वरून मोरगावला येताना) घेऊन जात असल्याची जाणीव होते. आपला मोठा भाऊ 'भावडू' याच्या अकाली निधनामुळे खंडेराव व्यथित होतो. मोरगाव हे खंडूचं (अन हिंदूचं ही) केंद्र आहे. तो जेवढा मोरगाव पासून दूर जाईल तेवढी त्रिज्याच फक्त वाढेल पण केंद्र बदलणार नाही. आधिभौतिक (metaphysical) सिद्धांताच्या आधारे खंडेराव आणि त्याचे गाव यातील नाते स्पष्ट होते. तसेच खंडेरावच्या नेणिवा आणि जाणिवांचा पसारा दिसून येतो.
संदर्भ:-
नेमाडे, भालचंद्र.२०१०.हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन.
IBN लोकमत वृत्त वाहिनी वर महेश म्हात्रे यांनी मराठी भाषा दिन निमित्त नेमाडे सरांची
घेतलेली मुलाखत
शिवनाथ अशोक तक्ते
सह. प्राध्यापक,
इंग्रजी विभाग,
प्रा. नेमाडे यांनी ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ मध्ये मांडलेला निरंतर व्याप लक्षात घेता मला त्यातील भू-सांस्कृतिक जाणिवांचा तळ गाठण्याचा मोह झाला. ह्या कादंबरीला असलेले अनेक आयाम हे विविध जाणीव कल्पून घेऊन प्रकट होतात. एकाच वेळी ती वेगवेगळ्या स्तरांवर वाहत असते. तरीही आपला आत्मा, आपलं केंद्र अजिबात हरवू देत नाही. कादंबरीचा नायक खंडू अलियास खंडेराव विठ्ठल हा एक पुरातत्वीय संशोधक असून हडप्पा मोहेंजो-दडो प्रकल्पामध्ये कार्यरत असतो. त्याच्या बोलण्यात, वागण्यात आणि अभिव्यक्तीत असलेला ‘अंगार’ विविध चर्चा, चर्चासत्रे, परिसंवादांमधून उफाळून येतो. याचे मूळ तो स्वता: आपल्या मनाच्या चोरखणात कोंडलेल्या ‘संतापात’ असल्याचे (पान. ६८) कबूल करतो. नेमाडे खन्डेरावच्या तोंडून भविष्यवाहू आशा वदवून घेतात.
“साधेपणा किती उदात्त असू शकतो, हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो.ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. हिंदू लोक
काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात
गच्च जपून ठेवली आहे. सगळं तिथे अंधारात कुठेतरी ठेवलेलं असतं. ते न दिसू दे. हरवू दे. स्मृतीतून सुद्धा जाऊ दे. काही बिघडत नाही. केव्हातरी सापडेलच.”
(हिंदू पान. २७.)
खंडेराव ह्या सर्व आधुनिकतेच्या कचाट्यात हरवलेल्या जाणिवांचा आणि नेणिवांचा शोध घेण्याचा आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करतो. त्याचं ह्या शोधार्थ अविरत अंत:बाह्य उत्खनन चालू असते. विचारांदरम्यान त्याचा निरंतर प्रवास दिसून येतो. आदिम संस्कृतींचा शोध घेताना खंडेराव आत्ममग्न होतो. त्याचे हे उत्खनन अनेक पातळ्यांवर चालू राहते. मोहेंजो-दडोत काम करत असताना त्याला डॉ. जलील, प्रा. संखाळीया यांचा विशेष आदर वाटतो. वयाच्या ८० व्या वर्षीही जलील सरांचा उत्खनना बाबतचा जोश खंडेरावला आवडतो.
'मोरगाव' पासून सुरु होणारा खंडूचा प्रवास त्याला कितीदा पुन्हा पुन्हा मोरगावलाच घेऊन येतो. यावरून त्याची आपल्या गावाशी असलेली घट्ट नाळ दिसून येते. खंडेराव आपल्या मित्राचा-अलीचा उल्लेख 'यारु' असा करतो. यारुला तो आपली सर्व गुपिते सांगू शकतो. अगदी आपल्या 'तीरोनी आत्या' बद्दलही. तिला शोधण्यासाठी खंडेराव अलीच्या मदतीने लाहोर, पेशावर, रावळपिंडी इ. ठिकाणी असलेले महानुभाव मठ पालथे घालायला तयार आहे. नेमाडे यांनी आपल्या नायकाला असलेले भाषिक भान वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. महानुभवी मराठी रूप (यार- यारु) ही त्या जाणिवेची आठवण करून देते.
तसे पाहता 'हिंदू' च्या रूपाने नेमाडे सरांनी एक बृहद् असा सांस्कृतिक परिप्रेक्ष्य उभा केला आहे. पण ते स्वतः एका मुलाखतीमध्ये उल्लेख करतात की हा (हिंदूचा) पहिला खंड म्हणजे वादाच्या झाडाची फक्त एक फांदी आहे. यावरून नेमाडेंच्या साहित्यिक ताकदीची कल्पना येते. उत्खनन कॅम्प जवळील हॉटेलवाला दिलवर आणि आपले वडील विठ्ठलराव यांना उर्मट भाषेत हकालणारा हॉटेल मालक या दोघांत खंडेरावला कमालीची तफावत दिसून येते. जाणिवांच्या इतिहासातील 'मडकं' हा एक ठळक टप्पा आहे. मडकं हा एक संपलेल्या आयुष्याचा आशय. आशयशून्य घाट म्हणजे आयुष्य. ( पान ७१) असे खंडेराव सांगतो. हिंदूचे आशयसूत्र हे खंडेराव च्या स्वप्नांच्या प्रदेशातून मुशाफिरी करताना आढळते. नेणिवेच्या तळाला साचलेल्या संवेदना जाणीवेच्या पातळीवर आणून सोडत खंडेराव भूतकाळ आणि भविष्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतो. विपरीत घटनांचा समाचार घेताना 'गंदी बात' चा जाणून बुजून केलेला वापर विलक्षण आहे. धनाजीची गोष्ट सांगताना माणूस कसा आपल्याच मायाजालात ओढला जातो हे खंडेराव सांगतो. पीएचडी चा सातत्यानं येणारा संदर्भ त्याला भविष्य आणि वर्तमानाशी जोडतो. त्याच्यामते पीएचडी हा शक्यतेवर आधारित आशावाद आहे. वडील आजारी असल्याची तार आल्यावर त्याला काम अर्धवट सोडून मोरगावला परतावे लागते. या कामी त्याला अलीची खूप मदत होते. परतीच्या प्रवासात असताना तो वडिलांच्या आठवणीत रमतो. आणि आपला डोळा विटी लागल्यामुळे सुजला असताना वडील त्याला जळगावला मोफत कॅम्प मध्ये घेऊन जातात. तेव्हा वडील खंडूची आई प्रमाणे काळजी घेतात. माघारी येताना खूप उशीर होतो. वडील त्याला पाठकुळी घेऊन येतात. अन आताही बाबा त्याला (लाहोर वरून मोरगावला येताना) घेऊन जात असल्याची जाणीव होते. आपला मोठा भाऊ 'भावडू' याच्या अकाली निधनामुळे खंडेराव व्यथित होतो. मोरगाव हे खंडूचं (अन हिंदूचं ही) केंद्र आहे. तो जेवढा मोरगाव पासून दूर जाईल तेवढी त्रिज्याच फक्त वाढेल पण केंद्र बदलणार नाही. आधिभौतिक (metaphysical) सिद्धांताच्या आधारे खंडेराव आणि त्याचे गाव यातील नाते स्पष्ट होते. तसेच खंडेरावच्या नेणिवा आणि जाणिवांचा पसारा दिसून येतो.
संदर्भ:-
नेमाडे, भालचंद्र.२०१०.हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. मुंबई: पॉप्युलर प्रकाशन.
IBN लोकमत वृत्त वाहिनी वर महेश म्हात्रे यांनी मराठी भाषा दिन निमित्त नेमाडे सरांची
घेतलेली मुलाखत
खूप छान आहे सर...(हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ).... सर अजून एक.topic वर.... विचार मांडून स्पष्ट कराल का?......आणि हे पण खूप छान होते 👍
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! आणखीही वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त व्हायला नक्कीच आवडेल. मनपूर्वक आभारी आहे!
DeleteSuper
ReplyDelete