Wednesday, February 26, 2020

वर्मी घाव बसल्या सारखं

पूर्णांक-अपूर्णांक
शपथेवर सांगण्यातल्या काही गोष्टींपैकी एक महत्वाची बाब म्हणजे #आताच्या पिढीला नेमकं झालंय काय?
आज काल सर्रासपणे (रिकामटा!) चालणारा उद्योग म्हणजे
¶ जमिनीवर पालथं पडून घेतलेला फोटो स्क्रीनवर, स्टेटसवर अथवा वॉलवर ठेवणं.
¶ स्वतःला वेगवेगळ्या रुपात आणि स्वरूपात पाहणं किंवा तसे फोटो संपादित (edit) करणं.
¶ तर्हेवाईक हेअर कट आणि हेअर स्टाईल करणं जे (मुळातच हेटाळणीजन्य असतं!) मुळीच सुट होणारं नसतं.
¶ कपड्यांचा सेन्स आणि पेहराव तर अत्यंत बटबटीत. (फाटलेल्या विजारी म्हणजे आर्थिक परिस्थितीची खुली जाहिरातच!)
¶ स्वतः चं अति दैवतीकरण आयकॉनिकरण.
¶ हातामध्ये शस्त्र (पिस्तुल, तलवार इत्यादी) घेऊन काढलेले फोटो.
¶ विनाकारण 'त्या' गटात न बसणाऱ्या लोकांस बेदरकार आणि बेसुमारपणे टॅग करून त्रास देणे.
     आदि उपद्व्याप करून नेमकं काय मिळवायचंय आणि काय दाखवायचंय ह्या #आजच्या पिढीला? हेच कळण्याच्या पलीकडचं झालंय.

● शस्त्रांबरोबर फोटो काढण्यापेक्षा 'शास्त्रा'बरोबर(  विशेषतः पुस्तकांबरोबर) फोटो काढल्यास कोणता कमीपणा येईल?
● फॅन्सी ड्रेस पेक्षा बदल म्हणून महापुरुषांच्या व्यक्तिरेखा   जगण्याचा प्रयत्न करता येईल का?
● झाडांबरोबर सेल्फी काढून तो स्टेटसवर ठेवता येणार नाही का?
  विचार प्रक्रिया आणि मानसिकतेत परिवर्तन होण्याची हीच खरी वेळ आहे.
शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर

No comments:

Post a Comment