काकड आरतीचा मंगल ध्वनी
हा घुमतो कानामधी
दक्षिण गंगा गोदावरीचं
खळखळतं पाणी.
भक्त चालती वाट शिर्डीची
घेऊन आस मनी
लोटांगण जन घेती गुरुस्थळी
साईंच्या चरणी
गुरु आज्ञेने अवतरली
बा सद्गुरूची महती
श्री साईंच्या अगाध लीला
लिहिल्या ग्रंथरूपी
दासगणू करी देशाटन
नमी साईंची महती
घाट नर्मदा स्थळी निर्मिली
दिव्य स्तवनमंजिरी
वाडा आणिक मशिदमाई
येथे श्रीं वसती
माई द्वारका स्थळी प्रज्वलित
अखंड साई धुनी
गुरुस्थानीही तेवत राही
श्रद्धेच्या ज्योती
मधुर मिळते फळ चाखाया
सबुरी ठेवा मनी
© शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर