फुलांची डायरी केली जराशी शायरी केली
तुझे आयुष्य लिहिताना मनाची पायरी केली
●○●
आई कळते असे वाटते पण आई कळतेच कुठे?
मेंदूच्या पटलावर आता असेल का हो गाव तिचे
हजार जुळवू खिळे आपण छाप तरी उमटेल तिथे?
यातील सारे सारे घडते आई जेव्हा जाते
रग लागते बेंबीला अन् नाळ ओढली जाते
ही अविनाशी गाणी ..., |
●○●
काही रचना 'स्वरलतेच्या', आळवितो मी जेव्हा
आपसूक माझ्या डोळा येते, गंगौघाचे पाणी
उपकारांचे नाही ओझे, नक्षत्रांचे देणे
हिशोब नाही हा जुळणारा, ही अविनाशी गाणी
मी ओळींच्या नशिबी नाही,ओळी माझ्या नशिबी
रित्या कवींच्या समोर धरली, भरलेली फुलदाणी
अस्तित्वाची भिजकी माती उचलून घेतो हाती
पाठीमध्ये अधिकच झुकले इथले पाळीव प्राणी
टेकवतो मी माझा खांदा अलगद 'डोली' खाली
मातृत्वाचे झरे आटती जेव्हा निजते लेणी
विस्तीर्ण नदीचा काठ रडावा अमृत कंठासाठी
आर्त स्वरांनी सरो लगोलग संध्याकाळ विराणी
●○●
■ शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
०७-०३-२०२२ ११:३३ रात्रौ
No comments:
Post a Comment