#प्रा_नानासाहेब_गुंजाळ
यांस:
एक तुला पाठवितो कविता
त्या कवितेचे सोने कर तू
तुझा सुखी सहवास मिळू दे
एक होऊ दे शब्द तराने
हात तिचा धर घट्ट पकडूनी
अजून जरा ती अल्लड आहे
तार सप्तकातून घुमू दे
साज स्वरांनी कवितेचे घन
मध्य आळवून प्रदीर्घ संयत
फुलव तिचे असणे आशयघन
खोल तुझ्या खर्जात खुलू दे
कवि - कवितेचे एकाकीपण!
© *शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर*
No comments:
Post a Comment